१. कार्यवाहीवृत्तांच्या मूळ आवृत्तीमध्ये सभागृहामध्ये प्रत्यक्ष झालेल्या कामकाजाचा मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेतील माहितीचा समावेश आहे. कार्यवाहीवृत्तांच्या इलेक्ट्रॉनिक आवृत्तीत प्रश्न व त्यांच्या लेखी उत्तरांचा समावेश नाही. त्यामध्ये केवळ सभागृहात मौखिक स्वरूपात मांडलेले पुरवणी प्रश्न व त्यांना दिलेली उत्तरे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, संबंधित मंत्र्यांनी लक्षवेधी सूचनांवर केलेली निवेदने, म.वि.प.नियम ४६ व म.वि.स.नियम ४७ अन्वये करण्यात आलेली निवेदने तसेच स्थगन प्रस्तावांच्या सूचनांसंदर्भात केलेल्या निवेदनांचा समावेश त्यात नाही.
२. विधानसभा व विधानपरिषद कार्यवाहीवृत्ते ही प्रसिद्धीकरिता नाहीत. परंतु सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून तत्काळ सर्वसाधारण माहिती उपलब्ध होण्याच्या उद्देशाने केवळ ती इंटरनेटवर उपलब्ध करून दिली आहेत.
३. विधिमंडळ प्रकाशन हक्क : विधिमंडळाचे सर्व प्रकाशन हक्क हे राखीव आहेत. इतर व्यक्तींना केवळ त्यांच्या व्यक्तिगत माहितीकरिता म्हणजे व्यक्तिगत अभ्यास, संशोधन आणि सूचनात्मक किंवा शैक्षणिक उद्देशांकरिता त्यांच्या प्रिंटर किंवा फाईलमध्ये ही माहिती डाऊनलोड करण्याची अधिकारिता देण्यात आलेली आहे.
४. प्रकाशन हक्क व वापर : सदरहू फाईलमधील एखादी माहिती त्याच रूपात उद्धृत करण्यासाठी माननीय सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद व माननीय अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. संस्था व महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय संकेतस्थळ यांना सुयोग्य प्रकारे स्त्रोत रूपात दाखविणे आवश्यक आहे. तसेच ज्या माहितीसाठी परवानगी देण्यात आली आहे ती अक्षरश: त्याच रूपात उद्धृत करण्यात यावी व त्यात कोणताही बदल इत्यादी करण्याची परवानगी नाही.
५. उपयोगकर्त्यांना विनंती करण्यात येते की, या कार्याच्या दोन प्रती संपादन कक्ष, महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय यांना पाठविण्यात याव्यात, ज्यात माननीय सभापती, विधानपरिषद व माननीय अध्यक्ष, विधानसभा यांची परवानगी घेऊन सदरहू फाईलमधील एखादी माहिती उद्धृत करण्यात आली आहे.
६. संबंधित प्रकाशनाधिकारधारकाच्या (विधिमंडळ सचिवालय) लेखी परवानगीशिवाय सदरहू संकेतस्थळावरील माहितीचा कोणताही भाग, कोणत्याही माध्यमांमध्ये प्रसिद्ध करता येणार नाही, किंवा सार्वजनिक स्तरावर सहजगत्या उपलब्ध होणाऱ्या कोणत्याही संकेतस्थळावर किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक संशोधन प्रणालीद्वारे प्रक्षेपित किंवा संचित करता येणार नाही किंवा कोणत्याही त्रयस्थ पक्षाच्या संकेतस्थळाचा किंवा इलेक्ट्रॉनिक आधारसामग्रीचा किंवा संशोधन प्रणालीचा कोणत्याही पद्धतीने भाग करता येईल अशा स्वरूपात वापर करता येणार नाही किंवा कायद्याच्या कोणत्याही न्यायालयापुढे किंवा कोणत्याही प्राधिकरणापुढे पुरावा म्हणून तो सादर करता येणार नाही.
७. कार्यवाहीवृत्तांमधून एखादी माहिती उद्धृत देण्यासंदर्भातील परवानगीसंदर्भात असे नमूद करण्यात येते की, अशा उद्धृताद्वारे उद्भवू शकेल अशा कोणत्याही न्यायिक कार्यवाहीच्याविरूद्ध कोणत्याही प्रकारचे संरक्षण नसेल.
८. महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे कार्यवाही वृत्त पाहण्यासठी अथवा डाउनलोड करण्यासाठी उपरोक्त डिस्क्लेमर/अस्वीकरण याच्याशी सहमत असणे गरजेचे आहे.